मुख्य पृष्ट

 

वायु प्रदुषण :

वातावरणातील प्रदुषणाचे एक मुख्य कारण धूर आहे. शहरामधून धावणाîयाब बसगाडया, ट्रक्स रिक्षा, स्कूटर्स यांसारख्या स्वचलित वाहनांमधून वातावरणात पसरणाîया विषारी वायूमुळे प्रदूषणाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. वातवरणातील सल्फर डाय ऑक्साइड (SO2), नायट्रोजन डाय ऑक्साइडû  (NO2) आणि कार्बन मोनोक्साइड(CO) यांसारख्या अत्यंत विषारी वायूच्या प्रमाणात धोकादायक वाढ झालेली आहे. त्याशिवाय कार्बनी द्राव्य पदार्थांच्या बेंझेननामक (Benzene) विषारी कणांचे हवेतील प्रसारण ही आत्यंत चिंतादायक गोष्ट ठरते. त्यामुळे कर्करोग (Cancer)  होऊ शकतो. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते नाकाद्वारे श्वसनलिकेत जाऊन त्यामुळे स्वरयंत्र आणि फुफ्फुसांना कायमस्वरूपी इजा खोकला, श्वसनासंबंधीच्या व्याधी निर्माण झलयाचे आढ्ळून येते.

 त्याबरोबरच घरगुती तसेच औधोगिक कारणांसाठी वापरल्या जाणाîया कोळसा व इतर भूगर्भिय इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण होणारा SO2 वायू हा पण त्याला कारणीभूत आहे. धूर, सल्फेट/ ऍसिड  आणि धुकयाच्या मिश्रणामुळे तयार होणारे दाट धुकयाचे प्रदुषित आवरण युरोपातिल प्रगत देशांमध्ये तसेच काही विकसनशील देशांमध्ये आढळते. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाîया वाहनांमधून बाहेर पडणाîया  कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड तसेच इतर सुक्ष्म कणांमुळे शहरी वातावरणातील हवेवर दुष्परिणाम होतो।

  NO2 (नायट्रोजन ऑक्साइडû) व इतर उत्सर्जित कणांÇवर सूर्य प्रकाशामुळे होणाîया रासायनिक प्रक्रियांमुळे ओझोन तयार होऊन त्याचा परिणाम शहरी भागांपासून दूर असणाîया खेडयांतील वातावरणावरही होतो. आम्लीय वर्षा हा सुद्धा वाहनांच्या वापरानून उत्सर्जित होणाîया नायट्रोजन ऑक्साइडसचाच एक दूरगामी दुष्परिणाम आहे।

सल्फर डाय ऑक्साइड (SO2)

तरंगणारे सूक्ष्मदूषित कण (Suspended Particulate Matter- SPM)

कार्बन मोनोक्साइड(CO)

नायट्रोजन डाय ऑक्साइडû  (NO2)

ओझोन   (O3)

हायड्रोकार्बन्स (Hydrocarbons)

शिसे (Lead) व जड धातू (Heavy Metals)

आरोग्यावर होणारे घातक परिणाम

शिश्याच्या (Pb) संपर्कात अधिक वेळ आलयामुळे रक्त मेंदू, मज्जसंस्था, किडनी व रोगप्रतिकारक शक्तिवर विपरीत परिणाम होतात। सध्या अस्तित्वात असलेली कमी मात्रा सुदधा लहानमुलांच्या मेंदूच्या वादीवर आणि मध्यमवयीन माणसांच्या रक्तदाबावर परिणाम करु शकतो।

शिशे शरीरात साठून रहात असल्यामुळे, पुन्हा पुन्हा होणारे कमी मात्रांचे सेवनही हानीकारक ठरते. तसेच इतर प्रदूषकारी पदार्थांमुळे कॅन्सर होण्याची शकयता असते।

परिणाम होणारे देश

आम्ल वर्षेमुळे होणारे परिणाम अमेरिका,पूर्वीचे जर्मन गणराज्य, चेकोस्लोव्हाकिया,  नेदरलॅडस, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लँड, युगोस्लाविया आणि इतर काही देशांमध्ये प्रामुख्याने आढलून आले आहेत। जपान, चीन, आणि दक्षिण-पूर्व आशिया खंडातही हे दुष्परिणाम जावनू लागले आहेत।

भारतामध्ये SO2 वायूंचे उत्सर्जन १९६० नंबर तिप्पटीने वाढले आहे। हे प्रमाण जर्मनीमधील उत्सर्जनाच्या जवळपास पोचणारे आहे।

 

 परिचय | आम्लवर्षा | वातावरणीय प्रदुषक  | विश्वव्यापी बदलाव | ओझोन | कार्यकारी सदस्य  | मुलाख़त