मुख्य पृष्ट

 मुलाख़त

डॉ. गुफरान बेग़ यांना आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्थे तर्फे Norbert-Gerbier-Mumm (NGM) नावाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पृथ्वीवरील प्रदूषणासंबंधी नाविन्यपूर्ण संशोधनाबद्दल हा पुरस्कार आहे. त्या संशोधनाविषयी सविस्तर माहिती देणारी त्यांची मुलाख़त.

प्रश्न १. आपल्याला कोणत्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे? हा कशा करिता देण्यात येतो ?

ऊत्तर: मला World Meteorological Organization (WMO) म्हणजे आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्थे तर्फे Norbert-Gerbier-Mumm नावाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. WMO संस्था ही पदार्थ विज्ञान (Physics), मौसम विज्ञान (Meteorology), नैसर्गिक विज्ञान हया क्षेत्रात अतिशय नाविन्यपूर्ण संशोधन करणाîयास अशा प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित करते. WMO ही  युनाइटेड नेशन (United Nation) ची प्रमुख संस्था आहे. हा Norbert-Gerbier-Mumm पुरस्कार  स्वित्झर्लँड  च्या जेनेवा  येथे, त्यांच्या मुख्य कार्यालयात, एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला . हा पुरस्कार  "Review of Mesospheric Temperature Trends"  हया संशोधन संकल्पा बद्दल देण्यात आला आहे. हा संकल्प आंतरराष्ट्रीय  Journal," Review of Geophysics"  मध्ये डिसेंबर २००३ ला प्रकाशित झाला. Norbert-Gerbier-Mumm पुरस्कार हा मौसम विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा व नावाजलेला समजला जातो. हा पुरस्कार WMO च्या १८७ सभासद देशांपैकी एका देशाला देण्यात येतो.

प्रश्न २. हा पुरस्कार भारतीय शास्त्रज्ञाला पहिल्यांदाच मिळाला आहे का?

ऊत्तर: होय. हा NGM- पुरस्कार  पाहिल्यांदा भारत  देशात आम्हाला मिळाला आहे। मी व माझा ग्रुप भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (IITM) व निदेशक यांनी आम्हाला संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सौ. सुवर्णा फडनवीस   या संकल्पाची सहकारी आहे.

प्रश्न ३. आपण हे जे नवीन संशोधन केले आहे त्याकरीता आपणास हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला आहे, त्यावददल आपण सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले तर बरे होईल.

ऊत्तर: आपण सर्वांना पृथ्वीवरच्या प्रदूषणाची माहिती आहे. कारखान्यातून म्हणा किवा वाहनातून म्हणा बाहेर पडणारे CO2, CH4, NO2  वगैरे वायू हे जमिनी पासून निघणारे दीर्घ तरंग विकिरण (Long wave radiation) शोषून घेतात .त्यामुळे जमिनीच्या जवळच्या वातावरणाच्या थराचे तापमान हे वाढते, त्याला Global warming म्हणतात. Global warming बद्दल साधारणता सर्वांना माहिती आहे. हे जे CO2 ,CH4 ,N2वायू आहे त्यांना Green House Gases म्हणतात हे GHGs समजा 15-16Km च्या वर पोहचले तर तेथे ते वेगळे परिणाम करतात. त्याबद्दल थोडणयात सांगायचे झाले तर वातावरणाच्या १६-५० की.मी. हया थराला  stratosphere म्हणतात व ५०-१०० की.मी. हया थराला Mesosphere म्हणतात. हे GHGs जेव्हा stratosphere व पुढे ऊंच जाऊन  Mesosphere  मध्ये पोह्चतात तेव्हा ते तेथे हवेला थंड करतात त्याला Global cooling असे म्हणातात. Global warming बद्दल सर्वांना साधारण माहिती आहे पण Global cooling हे नवीन आहे. जसे जसे जे GHGs वरती वरती जातात त्या प्रमाणात त्याचीं थंडावा देण्याची क्षमता पण वाढते. त्यांनी वातावरणाचे तापमान कमी होते म्हणजेचा वातावरण    Ionosphere  आकुंचन पावते. आम्ही हे सिद्ध केले आहे .आम्ही आमच्या संशोधनात वातावरण थंड होण्याचा दर पण सांगितला आहे. तर आपण अंदाज करु शकतो की  Ionosphere  कशा प्रकारे आकुंचित पावत आहे.अशा आकुंचनामुळे वातावरणाच्या Ionosphere थरातील electron density वाढ्त जाते. ही electron density, Radio आणि  TV signal reflection  म्हणजेच परावर्तना करीता करणीभूत आहे! ही electron density ची मात्रा दर वर्षाला १% वाढते. त्यामुळे वातावरणाचा हा थर  असंतुलीत झाला आहे!

प्रश्न ४. हया संशोधनाचा सर्व सामान्य माणसाच्या जीवनाशी कसा संबंध आहे।

ऊत्तर: मोठा संबंध- रेडिओ प्रसारणाप्रमाणे सर्वसामान्य माणसाला आवश्यक TV Channels, किंवा दुसरे Communication Services ( Satellite चा उपयोग करणे ) हयांच्या प्रसारणावर परिणाम होऊ शकतो. त्याचे कारण असे की वातावरणच्या आकुंचनाने उपग्रहाच्या कक्षे वर परिणाम होते. उपग्रंहाच्या कक्षात Distrub फरक पडतो. आपणच निर्माण केलेल्या Pollution मुळे आपल्याला उपलब्ध होणाîया सेवा विस्कळीत होऊ शकतात.साधारणता ५०-२५० की.मी. हया वातावरणाच्या थरातून Inosphere मधून रेडिओ लहरी पाठवल्या जातात , व हे वरचे वातावरण आकुंचित पावत असत्याने त्याचा रेडिओ लहरींच्या प्रसारणावर परिणाम होईल. आपणा सर्वांच्या लक्षात आले असेल की जे रेडिओ स्टेशन सिलोन(Selon), बी बी सी (BBC), वॉईस ऑफ अमेरिका (Voice of America) इत्यादि. पूर्वी पटकन लागायचे ते आता काळजीपूर्वक टयून (Tune) करावे लागतात.

याचा वातावरण व हवामान वर बराच काल पर्यंत राहणारा होऊ शकतो सध्याच्या घटकेला ह्यावद्द्ल स्पष्ट सांगणे कठीण आहे. हया बद्द्ल सर्व जगभर संशोधन चालू आहे.

प्रश्न ५. ह्याचा Local Radio Station वर पण परिणाम होऊ शकतो का?

उत्तर: Local Radio Station वर होणारा परिणाम तितका गंभीर नसेल. तो अगदी न जाणवण्या इतका असेल. त्याचे कारण असे की Transmitter आणि Receiver हे जवळ जवळ असतात ,त्यामुळे  Signal हा  Strong असतो . व आता पर्यंत जे बदल झाले आहेत वातावरणाच्या  Mesophere थरात झाले आहे. त्यामुळे  Local Station च्या प्रसारणातील फरक हा अगदी नगण्य आहे.

प्रश्न ६. भारत देशात प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे?

ऊत्तर:  भारतात सर्वात प्रमुख प्रदूषणाचे कारण हे Bio-Fuel आहे. भारतातील ८० टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे. आणि ग्रामीण भागात लाकडाचे ज्वलन, शेणखताचा वापर हा मोठया  प्रमाणावर होतो. त्यातून कार्बन हा खूप प्रमाणात बाहेर पडतो. हया शिवाय कोळशाचा वापर,  Petrol  आणि डिझेलचा वापर (2 Stroke engine  मध्ये ), रॉकेल (Kerosine) चा वापर पण पुष्कळ  होतो.

प्रश्न ७.  हे संशोधन पूर्ण करण्यास आपणस किती वेळ लागला? आणि हा विचार आपल्या मनात केव्हा व कसा आला?

ऊत्तर:   मी व माझा ग्रुप GHGs चे वातावरणाच्या, Ionosphere मध्ये होणारे परिणाम हया वर मागील वर्षा पासून काम करत आहीत. हया कामाची सुरूवात १९९९ मध्ये जेव्हा LT-ACT  नावाचे आंतरराष्ट्रीय Symposium झाले तेव्हा झाली. LT-ACT हे मीच IITM, Pune  मध्ये Organize केले . त्या Conference मध्ये एक आंतरराष्ट्रीय स्थापना करण्यात आली. त्या संघटनेत २० वेगवेगळे  देश हया संदर्भात कार्य करत होते. मी त्या संघटनेचा अध्यक्ष आहे. अशा प्रकारे ५ वर्षानंतर  हे नवीन संशोधन करता आले.

प्रश्न ८. हया संशोधनाने भारत देशाला कशा प्रकारे फायदा होईल?

ऊत्तर:  हया संशोधनामुळे आपला भारत देशाता वैज्ञानिक क्षेत्रात पुढचे किवां महत्वाचे स्थान मिळाले आहे.  हया नंतर आपला देश आंतरराष्ट्रीय थरावर महत्वाच्या कार्यक्रम (Program)  मध्ये किवा नवीन  Strategies plan करण्यात पुढाकार घेईल. प्रदूषणामुळे वातावरणाच्या वरच्या थरात होणारे परिणाम हया विषयात फक्त आपल्या कडे तज्ञ व्यक्ती ( expertise ) आहेत.

प्रश्न ९.  हा प्रश्न सोडवण्या करिता काय उपाय करायला हवेत?

ऊत्तर: हा प्रश्न सोडवण्याचे उत्तर तर अतिशय सोपे आहे. वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होणे अत्यंत  आवश्यक आहे. ग्रामीण भागात होणारे लाकड़ाचे ज्वलन, cow dunk  चे ज्वलन कमी करणे आणि त्या ऐवजी cooking gas वापरणे. वाहनाकरिता नवीन technology चा वापर करा आणि जुन्या गाडया वदल करणे आवश्यक आहेतहयावर उपाय असा की   Non - conventional  sources of energy, CNG चा वापर व्हायला हवा. आपल्या भारत देशात कोळशाचे कारखाने पण खूप आहे. तेव्हा अशा गोष्ठी वर नियंत्रण केल्यास आपण होणारा परिणाम कमी करू शकतो.

संपूर्ण भारतात वापरले जाणारे Petrol हे USA च्या एकटया California शहरात  वापरल्या जाणाîया Petrol  एवढे आहे. पण भारताचे प्रदूषण हे California पेक्षा जास्त आहे.  त्याचे कारण आता सांगितल्या प्रमाणे Old vehicle, 2 Stroke engine वाहन, वगैरे आहे तर   थोडवयात सांगायचे झाले तर प्रदूषणावर नियंत्रण करावयासच हवे.

 

 परिचय | आम्लवर्षा | वातावरणीय प्रदुषक  | विश्वव्यापी बदलाव | ओझोन | कार्यकारी सदस्य  | मुलाख़त