मुख्य पृष्ट

 

ओझोन (O3) :- ओझोन वायू वातावरणात जमिनीलगतच्या थरात तसेच अतिउंचीवर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आढळतो. वातावरणात उंचीवर असलेला ओझोन सूर्यापासून निघणाîया घातक किरणांपासून आपले संरक्षण करतो. ओझोन वायू सुर्यप्रकाशात होणाîया नायट्रोजन ऑकसाईडस आणि क्रियाशील जैविक रसायनांच्या प्रक्रियेतून निर्माण होतो. त्यामुळे उन्हाळयात  ओझोन वायूचे प्रमाण अधिक आढळून येते. नायट्रोजन ऑकसाईडस ही भूजैविक इंधनाच्या ज्वलनाने (कोळसा, पेट्रोल इ.) तयार होतात. आणि क्रियाशील जैविक रसायने ही कारखाने , झाडे अशा विविध स्त्रोतांमधून उत्पन्न होतात.

                        जमिनी लगत आढळणारा ओझोन मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम करतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना वारंवार झटके येणे व इतर लोकांमध्ये घसा सुजणे, कफ व श्वसनाचे विकार अशी लक्षणे आढळतात. ओझोनमुळे झाडे व शेतीवरही विपरित परिणाम होतो. जमिनीलगत तयार होणाîया ओझोनचे मुख्य कारण नायट्रोजन ऑकसाईडस व हाइड्रोकार्बन वायूं सूर्यप्रकाशात होणारी रासायनीक प्रक्रिया हे आहे. हे हाइड्रोकार्बन वायू वाहनामधून, रासायनिक कारखाने, रंगाचे कारखाने, पेट्रोल व गॅसची रिफायनरी या सारख्या मानवी गतिविधींतून निर्माण होतात.

जमिनीलगत आढळणारा ओझोन घातक आहे. मात्र उंचीवर आढळणारा ओझोन आपले अतिनील किरणांपासून (Ultra violet rays) संरक्षण करतो.

 

 परिचय | आम्लवर्षा | वातावरणीय प्रदुषक  | विश्वव्यापी बदलाव | ओझोन | कार्यकारी सदस्य  | मुलाख़त